नांदेड: सगरोळी येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ तरुणांना चिरडले | पुढारी

नांदेड: सगरोळी येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ तरुणांना चिरडले

बिलोली; पुढारी वृत्तसेवा: बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू डेपोतून रेती घेऊन भरधाव जाणाऱ्या हायवाने सगरोळी बसस्थानकाजवळ मोटर सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात टायरखाली चिरडल्याने २ तरुणांचा मृत्यू झाला. आज (दि.२६) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सगरोळी वाळू डेपो (क्र. २) मधून भरून निघालेला हायवा (एम एच ०४ एफ.जे.९७०९) देगलूरकडे जात होता. यावेळी हायवाने शक्करवार यांच्या आडतीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला (टी.एस.१६ इ.वाय. ८६७८) ला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मोईन वजीरसाब शेख (वय ३०, रा. हिप्परगा, ता. बिलोली) व नवीन संग्राम पवार (वय २४, रा. सगरोळी) या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. नवीन पवार च्या अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन्हीही युवकांचे मृतदेह भर उन्हात रस्त्यावर पडलेले होते. याच्या निषेधार्थ संतापलेल्या ग्रामस्थांनी तब्बल सात तास सगरोळी – हिप्परगा मार्गावर रास्ता रोको केला.

हेही वाचा 

Back to top button