चुडावा पोलीस
चुडावा पोलीस

परभणी: सारंगीत चाकू भोसकल्याने महिला गंभीर जखमी

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: मोटार दुरुस्तीच्या कारणावरुन महिलेला शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्या पोटात चाकू भोसकून जखमी केले. ही घटना सारंगी (ता. पूर्णा) येथे बुधवारी (दि.२२) घडली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सारंगी येथील मुक्ताबाई जनार्धन जोगदंड (वय‌ ४०) २२ मेरोजी दुपारी १ वाजता घरी असताना त्यांच्या भावकीतीलच संशयित आरोपी शैलेश उर्फ धीरज जोगदंड, गंगाबाई दशरथ जोगदंड (रा सारंगी) यांनी संगनमत करुन सामाईक मोटारीच्या दुरुस्तीच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर शैलेश याने गंगाबाई हिच्या पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले.

सपोनि नरसिंग पोमनाळकर, पोउनि बळीराम राठोड, जमादार हिरक यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राठोड करीत आहेत.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news