मुलुंड पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू
भांडुप ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मुलुंड च्या पाच रस्ता परिसरात असलेल्या पालिका प्रसूतिगृहमधील ही धक्कादायक घटना आहे.
मुलुंड च्या डंपिंग रोड परिसरात रहाणाऱ्या आठ महिन्याच्या गरोदर निशा कसबे यांना या पालिकेच्या रुग्णालयात सोमवार (दि. २७) रोजी दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली.
- kirit somaiya : किरीट सोमय्यांनी मंत्री मुश्रीफांवर पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारींची यादी वाचली का?
- Bhavana Gawali : खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला ईडीकडून अटक
यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. अखेर दोन वाजता येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाना याची माहिती दिली.
त्या नंतर त्या महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. प्रसूतीगृहामध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाही. आणि यामुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.
- Marathwada flood : मराठवाड्यात पावसाचे थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
- सांगली : ठाकरे सरकारचे मंत्री मंडळ तरूंगात तर निम्मे रूग्णालयात असेल : किरीट सोमय्या
याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. तर दोषींवर कडक कारवाईची मागणी नातेवाईक करीत आहेत.
याबाबत स्थानीक आमदार मिहीर कोटेचा यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता, रुग्णालय मधील डॉक्टरांनी इथे फक्त सकाळी ९ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध असल्याची कबुली दिली आहे.या मुळे आमदार कोटेचा यांनी देखील संताप व्यक्त केला असून या बाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले.
- Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे राजधानी दिल्लीची अभूतपूर्व कोंडी ! वाहतूक कोलमडली
- Hyderabad vs Punjab : होल्डरच्या आक्रमक खेळीनेही हैदराबादची नाही वाचली लाज
- माझी तुझी रेशीमगाठ : परी आणि आई म्हणतेय अपने पास बहुत पैसा है…
- Aurangabad rain update : १२ तास दमदार पावसामुळे औरंगाबाद शहर पाण्याखाली