Stock Market Today | केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला | पुढारी

Stock Market Today | केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला

Stock Market Today : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बुधवारी (दि. १) देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करतील. त्याआधी शेअर बाजारात आज तेजी आली. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४४२ अंकांनी वाढून ५९,९९० वर गेला. तर निफ्टी १७,७८८ वर पोहोचला होता. केंद्रीय अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना अनेक अपेक्षा आहेत. जर अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना दिलासा देणाऱ्या घोषणा झाल्या तर शेअर बाजारात आणखी तेजी येऊ शकते.

आज सुरुवातीच्या व्यवहारात येस बँक, व्होडाफोन आयडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स पॉवर ग्रिड यांचे शेअर्स वधारले होते.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड आणि एसबीआय हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वाढले आहेत. एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा हे देखील शेअर्स तेजीत आहेत. एल अँड टी हा शेअर्स घसरला आहे. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी रिअल्टी १.३६ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.१५ टक्के वाढला. बँक, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्स वाढले आहेत. (Stock Market Today)

दरम्यान, आज डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१८ टक्के वाढून ८१.७७ वर खुला झाला. रुपया मागील सत्रात ८१.९२ वर बंद झाला होता.

 हे ही वाचा :

Back to top button