Jammu and Kashmir blasts : जम्मू काश्मीरमधील नरवाल येथे दोन बॉम्ब स्फोट, ६ जखमी | पुढारी

Jammu and Kashmir blasts : जम्मू काश्मीरमधील नरवाल येथे दोन बॉम्ब स्फोट, ६ जखमी

 पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमध्ये सलग दोन स्फोट झाले. येथील नरवाल येथे आज झालेल्या दोन स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत, शोधमोहिम सुरू केली आहे. दरम्यान घटनास्थळी १२ बोअरच्या बंदुकीची रिकामी काडतुसे सापडली आहेत, अशी माहिती जम्मूचे पोलिस अधिकारी मुकेश सिंग यांनी दिली आहे.

या स्फोटची माहिती मिळताच, जम्मू-काश्मीरचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने घटनास्थळाचा व्हिडिओ ट्विट करत दिली आहे. प्रजासत्ताक दिन आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे जम्मू विभागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.

काल रात्री पहिला स्फोट

एक दिवसापूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या घरी स्फोट झाला होता. सुरनकोटचे माजी आमदार आणि प्रमुख गुज्जर नेते चौधरी मोहम्मद अक्रम यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७. ३०  च्या सुमारास घडली आणि लसाना गावात त्यांच्या घराच्या अनेक खोल्यांच्या छताला स्प्लिंटरने छिद्र पाडल्यामुळे त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले.

हेही वाचा:

Back to top button