जम्मू-काश्मीरमध्ये सय्यद अली गिलानीच्या घरासह जमात-ए-इस्लामीच्या इमारती होणार सील | पुढारी

जम्मू-काश्मीरमध्ये सय्यद अली गिलानीच्या घरासह जमात-ए-इस्लामीच्या इमारती होणार सील

पुढारी ऑनलाइन डेस्क: जम्मू-काश्मीर मधील बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीच्या (तीन बारामुल्ला, दोन कुपवाडा, एक बारामुल्ला आणि पाच गांदरबल) ११ मालमत्ता शनिवारी (दि.१७) जप्त करण्यात आल्या. या धर्तीवर हुर्रियत कॉन्फरन्सचे दिवंगत अध्यक्ष सय्यद अली गिलानीच्या नावावरील घरासह जमात-ए-इस्लामीच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश जम्मू आणि काश्मीरच्या प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश काल (दि.१९) श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी जारी केला आहे.

देशविरोधी कारवायांसाठी निधी जमवण्यात जमात-ए-इस्लाम पुढे होते. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर राज्याच्या तपास यंत्रणेने जमात-ए-इस्लामीच्या कोट्यवधी मालमत्तेचा शोध घेतला असून प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्वांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

हे वाचलंत का?

Back to top button