जम्मू-काश्मीर : बडगाम जिल्ह्यात चकमकीत दोन दहशतवादी ठार | पुढारी

जम्मू-काश्मीर : बडगाम जिल्ह्यात चकमकीत दोन दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी (दि.१७) सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरबाज मीर आणि पुलवामा येथील शाहिद शेख अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. दोन्ही दहशतवादी गेल्या आठवड्यात जवळच्या मगम भागातून पळून गेले होते, अशी माहिती पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बडगाममधील न्यायालयीन संकुलाजवळ भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका संशयित वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button