मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पहात आहे काय? : वैभव खेडेकर | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पहात आहे काय? : वैभव खेडेकर

खेड शहर ; पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पहात आहे काय? असा सवाल खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उपस्‍थित केला आहे. रायगड जिल्ह्यात रेपोलीजवळ काल (गुरुवार) पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. यावर खेडेकर यांनी अत्यंत कडवट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले; ” या रस्ते अपघातांना केवळ वाहनचालक जबाबदार नाहीत. पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १५ वर्षे सुरूच आहे. जे काम झाले आहे ते सदोष आहे. वळणमार्ग, सेवा रस्ते नाहीत. त्यामुळे रात्री वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अपघात होतात. या सर्व प्रकाराला जबाबदार असणारे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना त्‍यांनी दोषी ठरवले. या मार्गावर एखादा मोठा नेता अपघातात मरण पावला तरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहे का? असा प्रश्न त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

Back to top button