JEE Mains : जेईई मेन्सच्या वेळापत्रकात बदल, एक पेपर पुढे ढकलला
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची घेण्यात येत असलेल्या जेईई मुख्य परीक्षा (JEE Mains) सुरु होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीच वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. २७ जानेवारी रोजी होणारी परीक्षा आता २८ जानेवारी रोजी होणार आहे. एनटीएने अगोदर जाहीर केलेल्या वेळा पत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी रोजी होणार होती. आता त्याऐवजी परीक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन पर्यंत वेळापत्रकानुसार आता २४, २५, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२३ एनटीएने अगोदर जाहीर केलेल्या वेळा पत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी रोजी होणार होती. आता त्याऐवजी परीक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता २४, २५, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत परीक्षा होणार आहे. म्हणजेच २७ जानेवारीला कोणतीही परीक्षा होणार नाही. तर, २७ तारखेची परीक्षा ही २८ जानेवारीच्या नियोजनात समावेश केला आहे. यापूर्वी ही परीक्षा ३१ जानेवारी २०२३ रोजी संपणार होती, आता ती १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरु होईल.
परीक्षा (JEE Mains) सुरु होण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जेईई मुख्य पेपर १ परीक्षा दोन शिफ्टमध्ये बीई आणि बीटेक साठी घेतली जाईल. याशिवाय बीआर्च आणि बी प्लॅनिंग म्हणजेच जेईई मेन पेपर २ ची परीक्षा २८ जानेवारीला दुसऱ्या शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा देशातील २९० आणि परदेशातील २५ शहरांमध्ये होणार आहे. जर तुम्ही या परी- क्षेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरुन परीक्षा सिटी लिप डाऊनलोड करता येईल असे एनटीए म्हटले आहे.
हेही वाचा
- Intelligent : आपली मुले बुद्धिमान असावी, असे तु्म्हालाही वाटते का? आयुर्वेदाने सुचवलेले हे उपाय पाहा…
- काय ती बारामती, काय ते कृषिप्रदर्शन ! काय पवारांचे नियोजन, माझा शेतकरी एकदम ओक्के, शहाजीबापू पाटील यांची फटकेबाजी
- शिरूर : पाणी योजनांना स्रोत मिळेना; दमदाटी, धमक्यांनी, पोलिस बळाने आंदोलन दडपतात
- Intelligent : आपली मुले बुद्धिमान असावी, असे तु्म्हालाही वाटते का? आयुर्वेदाने सुचवलेले हे उपाय पाहा…

