Netflix : नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा सीईओ पदावरून राजीनामा, म्हणाले… | पुढारी

Netflix : नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा सीईओ पदावरून राजीनामा, म्हणाले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Netflix : नेटफ्लिक्सचे सह संस्थापक रीड हेस्टिंग्स सीईओ पदावरून राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे दोन दशकांचे त्यांचे प्रदीर्घ नेतृत्व संपुष्टात आले आहे. हेस्टिंग्स यांनी कंपनीला रेंट बाय मेल DVD सेवेपासून मनोरंजन जगरनॉट बनवले. राजीनामा देताना ते म्हणाले की हीच योग्य वेळ आहे. त्यांच्यासह दीर्घकाळापासून सोबत असलेले त्यांचे सहयोगी आणि सह-सीईओ टेड सारंडोस आणि कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ग्रेग पीटर्स यांच्या हाती नेटफ्लिक्सची कमान सोपविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हेस्टिंग्स यांनी आपला राजीनामा देताना म्हटले, आम्ही गेल्या काही काळात कोविड सारख्या आव्हानाचा सामना केला. याचा आमच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. बोर्ड आणि मी असे मानतो की राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या उत्तराधिकाऱ्यांच्या हाती पुढील कमान सोपवायला हवी.

मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सचे शेअर गेल्यावर्षी 38 टक्के इतके खाली आले होते. नंतर यामध्ये 6.1 टक्क्यांची वाढ झाली. मात्र काही अहवालांनुसार, 2022 च्या पहिल्या सहा महिन्यात नेटफ्लिक्स प्रचंड दबावात आले होते. तर शेवटच्या तिमाहीत नेटफ्लिक्सने बंपर कमाई केली.

Netflix : नेटफ्लिक्सचे कार्यकारी अध्यक्ष सारंडोस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर्सजवळ राजीनामा देतील. कंपनी तात्काळा प्रभावाने त्यांचा राजीनामा मंजूर करेल.

हे ही वाचा :

JEE Mains : जेईई मेन्सच्या वेळापत्रकात बदल, एक पेपर पुढे ढकलला

Vinesh Phogat : जर माझी हत्या झाली तर… ‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगाट

Back to top button