सिडकोत ७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास | पुढारी

सिडकोत ७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडकोतील शुभम पार्क परिसरातील सोने चांदिचे दुकान उघडून सफाई करत असताना दुकानात ठेवलेले ७ लाख रुपये किमतीचे दागिणे असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लपांस केली आहे. दिवसा घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांनी माहिती दिली की, सिडको उत्तम नगर परिसरातील शुभम पार्क, बंदावणे नगर येथे शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सद्गुरूअलंकार या सोन्याच्या दुकानाचे मालक प्रमोद विभांडीक हे नेहमी प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. त्यानंतर दुकानाजवळ पडलेली घाण साफ करण्यासाठी ते त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यासाठी गेले. त्यापूर्वी बाजूला असलेल्या किराणा दुकानदाराला त्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले.

त्यानंतर किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व दुकानदाराची दिशाभूल केली. तीन इसम पैकी दोन किराणा दुकानात तर एक ज्वेलरी शॉप मध्ये घुसला प्रमोद विभांडक यांनी ठेवलेली बॅग चोरी करत त्यांना सातपूरकडे जाण्याचा पत्ता विचारला. ही बाब दुकानमालक यांच्या लक्षात आली व ते तातडीने दुकानाकडे आले असता आपली बॅग लंपास झाल्याचे समजून आले.

७ लाखा रुपयांचा मुद्देमाल बॅगेत

त्यात तब्बल १५० ग्रॅम वजनाचे तसेच काही रोख रक्कम असा एकून ७ लाखा रुपयांचा मुद्देमाल बॅगेत होता. घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. या नंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुकत सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आपली बॅग पत्ता विचारणाऱ्या इसमानेच गायब केली असल्याचे समजले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचलत का :

कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी त्यांच्याच ऐतवडे बुद्रुक गावात उभ्या केलेल्या शाळेला भेट

Back to top button