Indian Idol 12 : सायली कांबळे हिनं बॉयफ्रेंडचं नाव सांगून टाकलं! | पुढारी

Indian Idol 12 : सायली कांबळे हिनं बॉयफ्रेंडचं नाव सांगून टाकलं!

पुढारी ऑनलाईन : ‘इंडियन आयडॉल १२’ मधील टॉप ६ स्पर्धकांपैकी एक सायली कांबळे हिची चर्चा होतेय. सायली कांबळे लोकप्रिय ठरली होती. महाराष्ट्राची लाडकी गायिका सायलीने आता आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तिचा सह-स्पर्धक निहाल टोरोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण, सायलीने आता तिच्या प्रेमाबद्दल सांगितलंय. तिने आपल्या प्रेमाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

Petrol-Diesel Price Today : डिझेल दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सायलीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकलीय. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो अपलोड केलाय. तिने बॉयफ्रेंडचं नावही सांगितलंय.

दूध दर : ‘कात्रज’ने केली शेतकर्‍यांची दिवाळी गोड, ७ कोटींचा देणार बोनस

हा तर ट्रेलर, पिक्चर बाकी आहे; फाशीची शिक्षा मिळताच माथेफिरूचा हल्ला

सायलीने बॉयफ्रेंडसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. तिने फोटोला कॅप्शन लिहिलीय. ‘चलो जी आज साफ साफ कहती हूँ, इतनी सी बात है मुझे तुमसे प्यार है’ -धवल. धवल असे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे.

पिंपरीत भाजपला आणखी एक धक्का, संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

डोंबिवली सामूहिक अत्याचारकांड : आणखी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिला नेटकऱ्यांकडून शुभेच्छा मिळत आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटलंय की -‘आज बहुत लोगों का दिल तुटेगा.’

सायली संगीत क्षेत्रात कशी आली?

सायलीच्या आईचे आजोबा संगीत शिक्षक होते. आईचाही आवाज सुंदर आहे. पण, आईला संगीत शिकता आलं नाही. माझा आवाज देवाने दिलेली देणगी आहे. माझ्या आईकडून हा आवाज मला मिळाला आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

माझ्या वडिलांना किशोर कुमार फार आवडतात. त्यांचं नावही किशोर आहे. माझं गाणं म्हणताना जर काही चुकलं तर ते मल समजावून सांगतात.

सायलीला गाण्य़ात करिअर करायचं आहे, असं सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयातील सर्वांना चिंता होती. पण, कुटुंबीयांनी तिच्यावर विश्वास ठेवला.

जॉब कर, असं घरातील मंडळींचं म्हणणं हतं. स्पर्धा परीक्षांचाही तिने अभ्यास केला. पण, तिला गाण्यात करिअर करायचं होतं आणि त्या दिशेने तिने आपलं मार्गक्रमण सुरू केलं.

सोयाबीन : प्रतिक्विंटलमागे ५ हजार रुपयांचा शेतकर्‍याला फटका

संकष्टी आज, पाहा चंद्रोदय कधी 

पिंपरीत भाजपला आणखी एक धक्का, संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

पाहा व्हिडिओ- अलका कुबल-आठल्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पुढारीची टिम भेटीला..

Back to top button