उत्तरप्रदेश निवडणूक : आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार | पुढारी

उत्तरप्रदेश निवडणूक : आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेश निवडणूक जवळ येईल तसे वातावरण तापू लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आरपीआयसोबत निवडणुका लढवाव्यात असे केंद्रीय मंत्री वारंवार सांगत होते मात्र, भाजपने त्याकडे लक्ष न देता आपले दोन साथीदार निवडले आहेत.

निषाद पार्टी आणि अपना दलासोबत भाजपने युती केली असून आगामी निवडणुका या दोन पक्षांसोबत भाजप लढणार आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, समाजवाद पार्टी आणि बहुजन समाज पार्टी तयारीला लागली आहे.

भाजप योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढणार असून हे राज्य राखणे भाजपसाठी खूप महत्त्वाचे आहे.

एकूण भौगौलिक प्रदेश पाहता हे राज्य केंद्रातील सत्तेसाठी महत्त्वाचे राज्य मानले जाते.

Petrol-Diesel Price Today : डिझेल दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

हा तर ट्रेलर, पिक्चर बाकी आहे; फाशीची शिक्षा मिळताच माथेफिरूचा हल्ला

त्यामुळे भाजप येथे ताकदीने उतरण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी अन्य पक्षांशी युती केली जात आहे.

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे वारंवार उत्तरप्रदेश निवडणुकीबाबत भाष्य करत होते.

उत्तरप्रदेश निवडणूक लढताना आपल्या पक्षाला काही जागा द्याव्यात. त्याचा भाजपला फायदा होईल, असे मत त्यांनी मांडले होते.

आठवले सध्या केंद्रात भाजपच्या कोट्यातून मंत्री आहेत. त्यामुळे तेथे आरपीआयला काही जागा मिळतील असे वाटत होते. मात्र, तसे झालेले नाही.

शुक्रवारी उत्तरपद्रेशचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि निषाद पार्टीचे संजय निषाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी निषाद पार्टीला योग्य जागा देण्यात येतील, असे प्रधान यांनी सांगितले.

तसेच निषाद पार्टीचे भाजपात विलिनीवरण करणार नसल्याचे निषाद यांनी सांगितले.

तसेच निषाद पार्टी आपल्या चिन्हावरच निवडणूक लढवेल असेही ते म्हणाले.

मल्लिका शेरावत हिचा ‘कास्टिंग काउच’वर मोठा खुलासा, रात्रीच्या पार्ट्या अन्…

रामराजे नाईक निंबाळकर : उमेदवारी अर्ज भरताना १० झाडे लावणे बंधनकारक हवे

‘एकत्र लढू’

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून मी उत्तर प्रदेशचा दौरा करत आहे. निषाद पार्टीसोबत भाजपची आघाडी आणखी मजबूत होईल.

२०२२ ची विधानसभा एकत्र लढली जाईल. ही आघाडी भाजपा, निषाद आणि अपना दलाची आहे.

ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर लढली जाणार आहे.

लोकांनाही या दोघांवर विश्वास आहे. निषाद पार्टी आणि अपना दलाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जितिन प्रसाद, संजय निषाद आणि बेबी रानी मौर्य सह अन्य एका नेत्याला विधानपरिषदेवर घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Back to top button