Profitable Share : ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर खरेदीचा विचार करत आहात? ‘हे’ चांगले शेअर्स २०२३ मध्ये करतील मालामाल | पुढारी

Profitable Share : ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर खरेदीचा विचार करत आहात? 'हे' चांगले शेअर्स २०२३ मध्ये करतील मालामाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२३ मध्ये आपल्या पोर्टफोलियोमध्ये जर तुम्हाला काही ऑटो स्टॉक्सचा समावेश करावयाचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मकडून ऑटो शेअर बाबत सल्ला देण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ऑटो सेक्टर्स मध्ये आगामी काळात तेजी पहायला मिळणार आहे. या रिसर्च फर्मने ज्या शेअर्सच्या खरेदीबाबतचा सल्ला दिलेला आहे, त्यामध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स यांचा समावेश आहे. या शेअर्समध्ये पुढाल काळात ३४ % इतके चांगले रिटर्नस मिळतील असा अंदाज यांनी वर्तविला आहे. (Profitable Share)

जाणून घ्या जास्त नफा देणाऱ्या शेअर्सविषयी (Profitable Share)

टाटा मोटर्स (Tata Motors)

मोतीलाल ओसवालने टाटा मोटर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. टाटाच्या शेअरमध्ये ५०० रुपये इतके टार्गेट ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी (दि. ४ जानेवारी) या शेअरची ३८५.७५ रुपये इतकी किंमत स्थिर झाली. याच अंकामध्ये वाढ होऊन पुढील काळात ३० % रिटर्न्स मिळू शकतील. २०२३ मध्ये टाटाच्या शेअर्स मध्ये M&HCV मध्ये २६ % इतकी वाढ होऊ शकते. LCVs च्या व्हॉल्युममध्ये २० % इतकी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर PVs सेगमेंटच्या व्हाल्युम मध्ये ४२ % इतकी वाढ होऊ शकते. २०२३ मध्ये एकूण व्हॉल्युमचा विचार करता ३२ % इतकी वाढ होऊ शकते असा अंदाज मोतीलाल ओसवाल फर्मने दिला आहे.

मारुती सुझुकी (Maruti Suzuki)

मोतीलाल ओसवाल यांचा मारुती सुझुकीवर 11,250 रुपये इतके टार्गेट ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी (दि. ४ जानेवारी) या शेअरची किंमत 8,419 रुपयांवर स्थिर झाली. पुढील काळात या स्टॉकमध्ये ३४ टक्के परतावा मिळू शकतो. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष 2023 मध्ये, वार्षिक आधारावर व्हॉल्यूम वाढीत सुमारे २ टक्के वाढ दिसून येईल. स्टॉक 35.5x/22.2x FY23E/FY24E कमाईवर ट्रेडिंग करत आहे. त्यामुळे या स्टॉक खरेदीचा सल्ला फायदेशीर ठरेल अशी शक्यता आहे.

आयशर मोटर्स (Eicher Motors)

मोतीलाल ओसवाल यांची आयशर मोटर्सच्या शेअरच्या खरेदीची शिफारस करण्यात आली आहे. या शेअरचे आगामी टार्गेट किंमत 4,150 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. बुधवारी (दि. ४ जानेवारी) शेअरची किंमत रु. ३,२१६ इतकी स्थिर झाली. आगामी काळात या स्टॉकमध्ये २९ टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button