Umran Malik : जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम; १५५ च्या गतीने... | पुढारी

Umran Malik : जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम; १५५ च्या गतीने...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १५५ च्या गतीने गोलंदाजी करत उमरान मलिकने जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला आहे. जसप्रीत बुमराहने यापूर्वी १५३.३६ च्या गतीने गोलंदाजी केली होती. बुमराहच्या खालोखाल मोहम्मद शमीने १५३.३ च्या तर नवदीप सैनीने १५२.८५ च्या गतीने चेंडू टाकला होता. (Umran Malik)

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उमरान म्हणाला होती की, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा सर्वांत वेगवान गोलंदाजी करण्याचा विक्रम मी मोडणार आहे. उमरानने त्यादिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात १५५ च्या गतीने चेंडू टाकला आहे. या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका बाद झाला. (Umran Malik)

शनाकाला बाद करत उमरानने विजय खेचून आणला

उमरान मलिकने वेगवान गोलंदाजी करत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद केले. शनाकाने उमरानच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युजवेंद्र चहने झेल पडकत त्याला बाद केले. (Umran Malik) उमरानने हा टाकलेला हा चेंडू या सामन्यातील सर्वांत वेगवान चेंडू होता. शनाका २७ चेंडूमध्ये ४५ धावा करत बाद झाला. शनाका बाद झाल्याने भारतीय संघाला विजय मिळवणे सोपे झाले. उमरानने टाकलेल्या वेगवान चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. उमरानने ४ षटकांमध्ये २७ धावा देत २ विकेट्स पटकावल्या.

उमरान तोडू शकतो शोएब अख्तरचा विक्रम (Umran Malik)

उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. त्याची कामगिरी पाहता उमरान लवकरच शोएब अख्तरचा विक्रम मोडेल, अशी भावना चाहते व्यक्त करत आहेत. शोएब अख्तरने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात १६१.३ च्या गतीने गोलंदाजी केली होती. सर्वांत वेगवान गोलंदाजी करण्याचा विक्रम शोएबच्या नावावर आहे. उमरान मलिकने २०२२ मध्ये आयरलँड विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण केले होते. (Umran Malik)

Back to top button