बिग बॉस मराठी -३ : स्नेहा वाघ कोण आहे? दोन लग्ने केली; पण...
पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कार दोघांनी ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभाग घेतला आहे.‘वीरा’ फेम स्नेहा वाघ हिने वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले होते. पण, लग्नानंतर तिला पतीचा छळ सहन करावा लागला. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ७ वर्षांनी तिने दुसरं लग्न केलं. तुम्हाला तिच्याविषयी या गोष्टी माहिती आहेत का?
वयाच्या २६ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आठ महिन्यात तिचं लग्न तुटलं.
दुसऱ्या पतीने मानसिक छळ केल्याचा दावा तिने केला. यानंतर प्रेम हे तिला द्वेष वाटू लागलं.
- संजय राऊत : ‘चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार’
- राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली
चंद्रगुप्त मौर्य आणि ज्योती यासारख्या अनेक हिंदी टीव्ही सीरियलमध्ये तिने आपली ओळख निर्माण केलीय.
तिने दोन लग्ने केली. पण, दोन्ही अयशस्वी ठरली. पहिल्या पतीने तिचं शारीरिक शोषण केलं. तर दुसऱ्याने तिचा मानसिक छळ केल्याचं तिने म्हटलं हाेतं.
२०१८ मध्ये स्नेहाने एका वृत्तवाहिनीला आपले पहिले लग्न का तुटले.
याविषयी उघड केले होते. दुसरे लग्न तुटल्यानंतर तिने वैवाहिक जीवनावर उघडपणे भाष्य केले होते.
तिचे पहिले लग्न वयाच्या १९ व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी झालं होतं. तेव्हा स्नेहाने म्हटले होते, ज्याच्यासोबत पहिलं लग्न झालं होतं तो तिच्या लायक नव्हता.
दोन्ही लग्न तुटल्यानंतर स्नेहाने म्हटलं होतं की-पुरुषांना हेडस्ट्रॉन्ग महिला आवडत नाहीत.
स्नेहाने दुसरे लग्न इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीशी केलं. हे लग्न केवळ ८ महिने टिकू शकलं. काही काळ ते दोघे वेगळे राहत होते. पण, कायदेशीररित्या वेगळे झाले नाहीत. तिचं म्हणणं आहे की, ती लवकरचं घटस्फोट घेईल.
स्नेहा का म्हणाली होती की, पहिल्या लग्नावेळी तिचे वय खूपचं कमी होते. पण, ७ वर्षांनंतर जेव्हा पुन्हा लग्न केले, तेव्हा दुर्देवाने तिने चुकीचा व्यक्ती निवडला होता. तिला प्रेम म्हणजे द्वेष वाटतं.
मराठी मालिकांमध्ये पदार्पण
सुप्रसिद्ध मराठी मालिका ‘काटा रूते कुणाला’ मधून छोट्या पडद्यावर स्नेहा हिने यशस्वी डेब्यू केला होता. यानंतर, तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. आपल्या शास्त्रीय नृत्य कौशल्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीचं रुंजी घातली आहे.
- तापसी पन्नू हिच्या ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
- राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली
- मिताली राज वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी कायम
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram