जायकवाडी धरणात ७३.८२ टक्के पाणीसाठा | पुढारी

जायकवाडी धरणात ७३.८२ टक्के पाणीसाठा

पैठण; पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणात ७३.८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पैठण तालुक्यात व जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्याल्यामुळे येथील जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

बुधवारी सकाळी धरण नियंत्रण कक्षात झालेल्या नोंदीनुसार १७ हजार ९३७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी १५१६.८४ फुटामध्ये पोहोचली आहे.

एकूण पाणीसाठा २३४०.७२७ झाला आहे. मागील वर्षी या तारखेला उपयुक्त टक्केवारी ९७ .७४ अशा पद्धतीची नोंद होती.

मधमेश्वर देवगड नेवासा या बंधाऱ्यातून ९१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत येथील धरणात येणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

हेही वाचलं का ? 

Back to top button