

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी सकाळी सात ते अकरा या वेळेत सर्वाधिक मतदान हे रावेर लोकसभेत 19.3 टक्के झाले. तर जळगाव लोकसभेत 16.89 टक्के मतदान झालेले आहे.
जळगाव लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात रावेर व जळगाव लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजेपासून सुरू झालेली आहे अकरा वाजेपर्यंतच्या वेळेत सर्वाधिक मतदान हे रावेर लोकसभेत 19.3 झालेले असून जळगाव लोकसभेत 16.89% झालेले आहेत. यामध्ये रावेर लोकसभेतील भुसावळ 18.63 चोपडा 20.95 जामनेर 15.87 मलकापूर 20.85 मुक्ताईनगर १७.६० रावेर 20.50टक्के मतदान झालेले आहेत. रावेर लोकसभेमध्ये सर्वाधिक कमी मतदान हे पालकमंत्री व राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 15.87 टक्के अकरा वाजेपर्यंत झालेले आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एक लाखाचा लीड मिळवून देण्याचे जाहीर केलेले आहे .
जळगाव लोकसभेमध्ये अंमळनेर 18.42 चाळीसगाव 16.1 एरंडोल 21.55 जळगाव सिटी १०.९४ जळगाव ग्रामीण 20.45 पाचोरा 16.14टक्के मतदान झालेले आहेत. यामध्ये जळगाव शहरांमधून अकरा वाजेपर्यंत सर्वाधिक कमी मतदान 10.94 टक्के झालेले आहेत. भाजपाच्या आमदाराच्या क्षेत्रामध्ये दुपारी अकरा वाजेपर्यंत सर्वाधिक कमी मतदान झालेले आहेत. व सर्वाधिक मतदान हे शिवसेना शिंदे गटाच्या एरोंडल व जळगाव ग्रामीण मतदार संघात झालेले आहेत यात एरंडोल मतदारसंघात 21.55 तर जळगाव ग्रामीण मधून 20.45 टक्के मतदान झालेले आहे
जळगाव शहरातील स्वर्गीय रामलालजी चौबे कला माध्यमिक विद्यालय या ठिकाणी मतदानाच्या रंग मोठ्या प्रमाणात लागलेल्या होत्या शाळेच्या आतील भागात टाकलेल्या मंडळामुळे मतदारांना उन्हापासून संरक्षण मिळत होते. मात्र या ठिकाणी मतदानासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना त्यांची खुर्ची आणण्यास मात्र त्रास होत होता मुख्य गेटमधूनच खुची नेण्यात अडचणी येत होत्या.