तापसी पन्नू हिच्या ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित | पुढारी

तापसी पन्नू हिच्या 'रश्मि रॉकेट' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नेहमीच आपल्या उत्तमोत्तम अदाकारीने प्रेक्षकांना थक्क करणारी अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा भेटीस येतेय. तापसी पन्नू हिच्या ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. आपल्या आगामी चित्रपटाद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला ती सज्ज झालीय.

खासदार ओवैसींच्या घरावर हल्ला; दिल्ली पोलिसांनी घेतले सहाजणांना ताब्यात

मिताली राज वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

हा चित्रपट येत्या दसऱ्याला म्हणजेच १५ ऑक्टोबरला झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपी आणि मँगो पीपल मीडियाद्वारे करण्यात आली आहे.

फ्लाईंग ड्रॅगन च्या जीवाश्माचा शोध

AUSWvINDW : ऑस्ट्रेलियाचा सलग २५ वा विजय

ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे. मात्र, तिच्याकडे एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. आकर्ष खुराना यांनी ‘रश्मी रॉकेट’चे दिग्दर्शन केले आहे. नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

आजचे राशिभविष्य (दि. २२ सप्टेंबर २०२१)

गुजरातमध्ये आढळला पांढरा कावळा!

यामध्ये ‘रश्मी रॉकेट’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळालीय. स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाईन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही ॲथलेटिक स्पर्धा सम्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.

पोस्टरमधून प्रेक्षकांना एड्रेनालाईन पैक्ड कथेची झलक दिसते आहे.ज्यामध्ये तापसी धैर्यशील आणि दृढ़ निश्चय दिसतो.
तापसी म्हणते – हा चित्रपट एका वेगळ्या तऱ्हेने खास आहे. बऱ्याचदा माझ्याशी तेव्हा संपर्क केला जातो.

जेव्हा स्क्रिप्ट किंवा दिग्दर्शक चित्रपट बनवण्यासाठी तयार असतात. मात्र, या चित्रपटाच्या कथेची वन लाईन चेन्नईमध्ये माझ्याकडे आली. तेथून एक पूर्ण चित्रपट बनण्याची तयारी सुरू झाली. असे आधी कोणत्या चित्रपटांविषयी झाले नव्हते.

पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक जण या कथेवर इतका ठाम होता. या चित्रपटाचा परिणाम मला माझ्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत अधिक प्रभावित करेल. मला याचा खूप अभिमान आहे.

दिग्दर्शक आकर्ष खुराना म्हणाले-

एक प्रेक्षक म्हणून मला नेहमीच कोर्ट रूम ड्रामा, परिपक्व रोमांस आणि खेळपटांमध्ये रुची राहिली आहे. एक कथाकार म्हणून मला नेहमीच पात्रांच्या बाह्य आणि आंतरिक प्रवासाचे आकर्षण राहिले आहे. या चित्रपटाने मला एका अशा गोष्टीवर काम करण्याची अनोखी संधी दिली. ज्यामध्ये या सर्व गोष्टी आहेत आणि सोबत तगडया कलाकारांची फळी आहे.

रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडड़िया यांची निर्मिती आहे. ‘रश्मी रॉकेट’ नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों द्वारा लिखित आहे.

यामध्ये सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.
‘रश्मि रॉकेट’ १५ ऑक्टोबरला झी ५ वर प्रदर्शित होत आहे.

नीट व्हावी ‘नीट’

बेगमपूरजवळ अपघातात एक ठार, दोघे जखमी

भारतात तयार होतेय आशियातील पहिली फ्लाईंग कार

Back to top button