असे करा हरळी नियंत्रण! | पुढारी

असे करा हरळी नियंत्रण!

हरळी हे खूप काटक तण असल्यामुळे ते एकदा शेतात वाढू लागले की, त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर तणनाशकाने किंवा इतर पद्धतीने नियंत्रण झाल्याचे दिसते. परंतु त्यानंतर शेतात पाणी दिले, की हरळी पुन्हा वाढू लागते. यावर पर्याय म्हणून ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर होय. मात्र त्याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

तण हे लुसलुशीत आणि चार ते पाच पानांवर असताना फवारणी करावी. बागेत फवारणी करताना फ्लॅट नोझलने आणि पंपाला हूड लावूनच फवारणी करावी. तणनाशक झाडाच्या जवळपास किंवा हिरव्या भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात पाणथळ जागा राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तणांच्या प्रादुर्भावानुसार हेक्टरी दोन ते चार लिटर ग्लायफोसेट प्रति 500-600 लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात करू नये. फवारणीनंतर 21 दिवसांपर्यंत शेताची मशागत करू नये. तणांच्या उगवणीपूर्वी बागेत ऍट्राझीन हे तणनाशक दीड ते तीन लिटर प्रति हेक्टरी फवारल्यास चांगले नियंत्रण मिळते.

– शैलेश धारकर

 

हेही वाचा :

Back to top button