Gold ornaments : सोन्याचे दागिने बनवण्यासाठीची चार हजार वर्षांपूर्वीची अवजारे | पुढारी

Gold ornaments : सोन्याचे दागिने बनवण्यासाठीची चार हजार वर्षांपूर्वीची अवजारे

लंडन : इंग्लंडमधील प्रसिद्ध स्टोनहेंजजवळ 19 व्या शतकात केलेल्या उत्खननात चार हजार वर्षांपूर्वीच्या थडग्यांचा शोध लावण्यात आला होता. तिथे दोन व्यक्तींना काही वस्तू व अवजारांसह दफन करण्यात आले होते. त्यापैकी दगडी अवजारांचा नेमका कशासाठी वापर होत होता याबाबत आता नव्याने संशोधन करण्यात आले आहे. या अवजारांवर सोन्याच्या कणांचा छडा लावण्यात आला आहे. त्यावरून या अवजारांचा वापर सध्याचे सुवर्णकार दागिने (Gold ornaments) बनवण्यासाठी जसा विविध साधनांचा वापर करतात तसा होत होता, असे दिसून आले आहे.

या संशोधनामुळे दफन केलेल्या व्यक्ती सुवर्णकार (Gold ornaments) होते की अन्य कुणी होते याबाबत नवे कुतूहल निर्माण झाले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘अँकिक्युटी’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. थडग्यातील वस्तू व्यक्तीच्या वैयक्तिक ओळखीपेक्षाही अधिक काही बाबींसाठी असू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. या अवजारांवरून कांस्य युगातील लोकांविषयी नवी माहिती मिळू शकते, असे संशोधकांना वाटते.

याठिकाणी दफन केलेल्या व्यक्ती सुवर्णकारही (Gold ornaments) असू शकतात, धाीतूकाम करणारे, जादूगार किंवा समाजातील महत्त्वाची व्यक्तीही असू शकतात. त्याबाबत आताच निश्चित सांगता येणे अशक्य आहे, असे बोर्नेमाऊथ युनिव्हर्सिटीचे आर्कियोलॉजिस्ट टिमोथी डारविल यांनी म्हटले आहे. सन 1801 मध्ये स्टोनहेंजपासून पश्चिमेला दहा मैलावर असलेल्या अपटोन लोवेल या गावात संशोधकांना कांस्य युगातील काही कलाकृती व वस्तू सापडल्या होत्या. त्यामध्ये या अवजारांचा समावेश होता.

हेही वाचा : 

Back to top button