हिंगोली : जवळाबाजार परिसरात ४१ अंश सेल्सियस तापमान | पुढारी

हिंगोली : जवळाबाजार परिसरात ४१ अंश सेल्सियस तापमान

जवळाबाजार ; पुढारी वृत्‍तसेवा जवळाबाजार परिसरात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. आज (मंगळवार) ४१ अंश सेल्सियस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांपासून दररोज तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्‍याचे दिसून येत आहे.

आज मंगळवार (३० एप्रिल) रोजी जवळपास ४१ अंश सेल्सिअस इतकी तापमानात वाढ झाली होती. दुपारच्या वेळेस बसस्थानक परिसरात तापमानात शुकशुकाट पहावयास मिळत होता. अजुन मे व जून महिला असे जवळपास दिड महिना उन्हाळ्याची परिस्‍थिती राहील. एकीकडे तापमानाल दररोज वाढ होत असताना दुसरीकडे महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्‍यामुळे नागरिकांना वाढणारा उष्‍मा असह्या होत आहे.

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १ मे रोजी ठाणे, रायगड, अहमनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेची लाट राहणार आहे तर. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि आर्द्रता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Heat Wave Alert)

मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासांसाठी आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८ अंश सेल्सियस आणि २७ अंश सेल्सियसच्या आसपास असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ४४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुणे येथे २२.४ अंश सेल्सियस हे सर्वात कमी किमान तापमान होते.

पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे; सौराष्ट्र, बिहार, ओडिशाचा काही भाग तसेच झारखंड, तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग, केरळचा उत्तर भाग, कोकण आणि रायलसीमामध्येही उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आहे. ओडिशामध्ये १५ एप्रिलपासून, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलपासून तीव्र उष्णतेची लाट असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ओडिशातील काही भागात तसेच बिहार, पश्चिम बंगाल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात रात्रीचे तापमान तीव्र उष्ण असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

हेही वाचा :

Back to top button