Stock Market Today | सेन्सेक्स तेजीत, बॅंकिंग शेअर्स आघाडीवर | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स तेजीत, बॅंकिंग शेअर्स आघाडीवर

Stock Market Today : अमेरिकेतील महागाई दर नोव्हेंबरमध्ये कमी झाल्याने तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल या शक्यतेने अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक ‍वधारले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. आज बुधवारी (दि.१४) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढून ६२,७०० वर गेला. तर निफ्टी १८,६०० वर होता.

टेक महिंद्रा, हिंदाल्को, विप्रो, आयशर मोटर्स आणि पॉवरग्रिड हे आज NSE वर सर्वाधिक १.८४ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. तर भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, अदानी एंटरप्रायझेस आणि एम अँड एम यांचे शेअर्स घसरले होते. येस बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयओबी, पीएनबी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, साउथ इंडियन बँक, सुझलॉन, व्होडा आयडिया आणि पीएसबी हे एनएसईवरील व्हॉल्यूमच्या दृष्टीने सर्वात सक्रिय शेअर्स आहेत. (Stock Market Today)

अमेरिकेची प्रमुख बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे आज आशियाई बाजार उच्च पातळीवर उघडले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.८४ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.८२ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.१३ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.६९ टक्क्यांनी ‍वधारल्याचे दिसून आले.

डेटा असा दर्शवितो की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील महागाई दर ऑक्टोबरमधील ०.४ टक्क्यांच्या वाढीनंतर नोव्हेंबरमध्ये ०.१ टक्के इतका किरकोळ प्रमाणात वाढला. वर्षभरात महागाई दर निर्देशांक ७.१ टक्क्यांनी वाढला आहे.

हे ही वाचा :

Back to top button