घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार; तरुणासह मैत्रिणीवर गुन्हा
अमरावती, पुढारी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यात एका महिलेवर तरुणाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. तसेच त्या तरुणाच्या मैत्रिणीनेही संबधित महिलेसोबत अश्लिल कृत्य करत अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- वाशिम : मुस्लिम बांधव करतात गेल्या ११ वर्षांपासून “श्री” विसर्जन
- गणपती बाप्पा मोरया ! पूढच्या वर्षी लवकर या…!
अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीत १७ सप्टेंबर रोजी घडली.
निखिल टिकले (रा. अर्जुननगर) असे त्याचे नाव असून त्याची १९ वर्षीय मैत्रीण या प्रकरणातील संशयित आरोपी आहे.
संबधित महिला आणि तरुण हे ओळखीतील आहेत. त्यांचे काही करणाने भांडण झाले होते. त्यातून ही घटना घडली.
फिर्यादी ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीनुसार निखिल हा फिर्यादीच्या घरात शिरला. त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
- मुलाला फोन करून सांगितले आणि पित्याने आत्महत्या केली
- पंजाबचा मुख्यमंत्री कोण ? अंबिका सोनी यांचा नकार
पीडित महिलेला संशय होता की, या गुन्ह्यातील युवतीसोबत तिच्या पतीचे संबंध होते. तसेच ती आरोपीच्या संपर्कात होती.
यावरून त्यांचे भांडण झाले होते. या गुन्ह्यातील तरुणाला संबधित तरुणाला तरुणीने लैंगिक अत्याचार करण्यास प्रोत्साहन दिले.
तिने आरोपीला महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याने पोलिसांनी तिलाही आरोपी केले आहे.
पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध भादंविची कलम ३७६,३७७,४५२,३५४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले करत आहेत.
हेही वाचा: