पंजाबचा मुख्यमंत्री कोण ? अंबिका सोनी यांचा नकार | पुढारी

पंजाबचा मुख्यमंत्री कोण ? अंबिका सोनी यांचा नकार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंजाबचा मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला आता उधाण आले आहे. ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची सूचना सोनिया गांधी यांनी केली होती, मात्र, त्यांनी नकार दिला आहे. ११ वाजता होणारी विधीमंडळ सदस्यांची बैठकही पुढे ढकलली आहे. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.

अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक नेते सीएमची खुर्ची पटकावण्यासाठी रेसमध्ये होते.

यात अबिंका सोनी यांचे नाव अग्रस्थानी होते.

शनिवारी रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

त्यानंतर सोनी यांनी आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, असे सांगितले.

तर दुसरीकडे विधीमंडळ नेता निवडण्यासाठी काँग्रेस आमदारांची बोलविलेली बैठक पुढे ढकलली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आजच पंजाबचा मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत.

तसेच प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

आमदार परग सिंह म्हणाले, ‘आता सर्व काही काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर अवलंबून आहे. हा हायकमांडचा विशेषाधिकार आहे.

विधीमंडळ सदस्यांची बैठक काल झाली आहे आणि जनादेशही दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीची गरज नाही.

अंबिका सोनी यांच्या नावावर चर्चा का?

पंजाबमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी रात्री उशिरापर्यंत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती.

त्यात काँग्रेस चे महासचिव के. सी. वेणूगोपाल, अंबिका सोनी सहभागी झाले. त्यावेळी सोनी यांचे नाव घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली होती.

मात्र, त्यांनी नकार दिला आहे. या पदावर कुणी शिख व्यक्तीच असली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आहे.

या बैठकीत अमरिंदर सिंग यांना शांत करण्याच्या रणनीतीवरही चर्चा झाली. पंजाबचा मुख्यमंत्री कोण याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

शिखांव्यतिरिक्त चेहरा देण्याचा प्रयत्न

सध्या सीएम पदाच्या रेसमध्ये सुनील जाखड, विजय इंदर सिंगला, प्रताप सिंह बाजा आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्यात शर्यत आहे. सुनील जाखड हे मुख्य दावेदार मानले जात आहेत. सध्या पक्ष शिख चेहरा वगळून सीएम देऊ इच्छित आहे. पुढील निवडणुका जिंकण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे. सुनील जाखड यांचे नाव चर्चेत असले तरी ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळचे असल्याने सिद्धू यांचा गट त्यास राजी नाही. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू हे शिख आणि मुख्यमंत्रिपदी शिखांव्यतिरिक्त चेहरा अशी काँग्रेसची रणनीती आहे.

हेही वाचा : 

Back to top button