वाशिम : मुस्लिम बांधव करतात गेल्या ११ वर्षांपासून “श्री” विसर्जन | पुढारी

वाशिम : मुस्लिम बांधव करतात गेल्या ११ वर्षांपासून "श्री" विसर्जन

वाशिम; अजय ढवळे : शहरातील जुम्मा शहा गेल्या 11 वर्षांपासून सर्वधर्म समभाव या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत वाशिम येथील मुस्लिम बांधव गेली 11वर्षा पासून जाती-पातीला थारा न देता सामाजिक बांधीलकीतून स्थानिक देव तलावात श्री विसर्जन करतात.

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या विसर्जनादरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत असून श्री विसर्जनाचे कार्यात मुस्लिम बांधव उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

वाशिम शहरातील देव तलावात घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडून तयार करण्यात आलेले विसर्जन रथ प्रत्येक प्रभागात तैनात आहेत.  या रथाद्वारे तसेच पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने विसर्जन करण्यात येत आहे. बाप्पाला निरोप देण्याकरीता मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवही विसर्जन कार्यात सहभागी झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी वाशीम नगर परिषदेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

शहारातील विविध प्रभागांमध्ये 25 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणपतीची आरती करून वाशिम शहरातील देव तलावात विसर्जन करण्यात येत आहे.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id=”37589″]

Back to top button