Ram Gopal Varma : चित्रपट प्रमोशनसाठी राम गोपाल वर्मांनी अभिनेत्रीच्या पायाचा घेतला किस (Video) | पुढारी

Ram Gopal Varma : चित्रपट प्रमोशनसाठी राम गोपाल वर्मांनी अभिनेत्रीच्या पायाचा घेतला किस (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ते अनेकदा वादात भोवऱ्यात सापडले आहेत. आता एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत.  सोशल मीडियावर त्यांचा चित्रपट प्रमोशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राम गोपाल वर्म यांचा ‘डेंजरस’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक व्हिडिओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर राम गोपाल वर्मांचा एका अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. राम गोपाल वर्मांचा हा चित्रपट प्रमोट करण्याचा फंडा कोणालाही अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे.

राम गोपाल वर्मांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल 

राम गोपाल वर्मा यांंनी ‘डेंजरस’ चित्रपट प्रमोट करण्यासाठी एक वेगळा फंडा वापरला. या व्हिडिओमध्ये ते अभिनेत्रीला फूट मसाज करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोफ्यावर बसली असून, ते जमिनीवर बसलेले दिसतात. दरम्यान, ते अभिनेत्रीचा पाय हातात घेऊन किस करताना दिसतात. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करताना लिहिलं आहे ‘आशू रेड्डीमध्ये डेंजरस मार्क कोठे आहे. फुल व्हिडिओ ३० मिनिटमध्ये ९:३० वर.’ तर फोटोमध्ये राम गोपाल वर्मा हे अभिनेत्रीचा पाय हातात घेऊन कॅमेराकडे पाहत आहेत.

या पोस्टवर युजर्स कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलंय, ‘मला वाईट वाटतं की जेव्हा रामू सरांना असे पाहतो. हे एकेकाळी इंडियन सिनेमाचे टॉप डायरेक्टर होते. ज्यांच्यासोबत सर्व मोठे अभिनेते काम करू इच्छित होते.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘रामू हे काय आहे, तुम्ही तर असे नव्हता, ऊठा.’

‘डेंजरस’ एक लेस्बियन क्राईम स्टोरी आहे, जी ९ डिसेंबर रोजी रिलीज होईल. या चित्रपटामध्ये अप्सरा राणी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button