रणवीर सिंह : काय विचित्र प्राणी आहे?

रणवीर सिंह : काय विचित्र प्राणी आहे?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रणवीर सिंहचा बहुचर्चित 'सर्कस' चित्रपट याच महिन्यात २३ तारखेला प्रदर्शित होत आहे. 'सर्कस'चे टीझर काही दिवसांपूर्वीच रीलिज झाले असून यामध्ये रणवीरचा लूक जबरदस्त दिसत आहे. नुकतेच रणवीरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 'सर्कस'च्या सेटवरील असून रोहित शेट्टीने हा शूट केल्याचे आवाजावरून दिसत आहे.

रणवीरने शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शेट्टी त्याला विचित्र प्राणी असल्याचे म्हणत आहे. रणवीरसोबतच 'सर्कस' या चित्रपटामध्ये पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे. या व्हिडीओत पूजा देखील दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, रणवीरच्या पुढे केक आहेत.. रणवीरच्या प्लेटमधील केळ संपल्याने तो पूजाजवळील केक खाण्याचा प्रयत्न करतो. परंतु पूजा त्याला केक देत नाही, मग रोहित शेट्टी म्हणतो की, विचित्र प्राणी आहे, कितीही खाल्ले तरीही तो भूकेलाच राहतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news