MMR : माता मृत्यू प्रमाणात लक्षणीय घट : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची माहिती | पुढारी

MMR : माता मृत्यू प्रमाणात लक्षणीय घट : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची माहिती

पुढारी ऑनलाइन डेस्क : बाळाला जन्म देताना होणा-या माता मृत्यूच्या प्रमाणात (MMR) लक्षणीय रित्या घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या यशाबद्दल ट्विट करून देशाचे अभिनंदन केले आहे.

बालकाला जन्म देताना 2014-16 मध्ये 130 वरून 2018-20 मध्ये माता मृत्यूचे प्रमाण (MMR) प्रति लाख जिवंत जन्मांमध्ये 97 वर आले आहे. म्हणजे हे प्रमाण 33 ने कमी झाले आहे.

भारताने MMR साठी राष्ट्रीय आरोग्य धोरण (NHP) लक्ष्य गाठले आहे. 8 राज्यांनी यासाठी शाश्वत विकास लक्ष्य गाठले आहे. याबाबत PIB दिल्ली ने 30 नोव्हेंबर 2022 ला 11.53 वाजता याबाबत पोस्ट केले आहे.

MMR चे प्रमाण प्रभावीपणे कमी करण्याच्या उल्लेखनीय प्रगतीची प्रशंसा करत डॉ. मांडविया यांनी ट्वीट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”माता मृत्यूचे प्रमाण 2014-16 मध्ये 130 वरून 2018-20 मध्ये प्रति लाख जिवंत जन्मासाठी 97 पर्यंत घसरले. दर्जेदार माता आणि पुनरुत्पादक काळजी सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान @NarendraModi जी यांच्या सरकारच्या विविध आरोग्य सेवा उपक्रमांनी MMR कमी करण्यात मोठी मदत केली.”

हे ही वाचा :

समलिंगी वकिलाच्या नावाला न्यायाधीश म्हणून केंद्राचा आक्षेप

सिंहस्थ कुंभमेळा : भूसंपादनासाठी थेट शासनालाच प्रस्ताव

Back to top button