मंचर : शेतकर्‍यांना चांगला दूध दर देण्यासाठी प्रयत्न करावा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल | पुढारी

मंचर : शेतकर्‍यांना चांगला दूध दर देण्यासाठी प्रयत्न करावा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल

मंचर; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांचे दूध स्वीकारणार्‍या दूध प्रकल्पांनी दुधापासून उपपदार्थ तयार करून शेतकर्‍यांना चांगला दर देण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथील आकाश दूध प्रकल्पाला पटेल यांनी भेट देऊन प्रकल्पाचे कौतुक केले. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, एकनाथ पवार, धर्मेंद्र खांडरे, आशाताई बुचके, दूध प्रकल्पाचे संचालक आकाश थोरात, रवींद्र त्रिवेदी, नवनाथ थोरात, गणेश थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री पटेल म्हणाले, की शेतकर्‍यांना दूधविक्रीतून पंधरा किंवा एक महिनाभरात पैसे मिळतात. शेतकर्‍यांनी दूध व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य केंद्राकडूनही केले जाईल. आकाश दूध प्रकल्पातील स्वच्छता पाहून मंत्री पटेल यांनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पाचे संचालक संजय थोरात आणि आकाश थोरात यांनी आकाश दूध प्रकल्पाविषयी माहिती देऊन मंत्री पटेल यांचा सत्कार केला .

 

 

 

Back to top button