सोलापूर : उड्डाणपूल भूसंपादनाबाबत पुढील आठवड्यात पालकमंत्री मुंबईत घेणार बैठक | पुढारी

सोलापूर : उड्डाणपूल भूसंपादनाबाबत पुढील आठवड्यात पालकमंत्री मुंबईत घेणार बैठक

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : उड्डाणपुलांमुळे बाधित असलेल्या विविध शासकीय विभागांच्या जागा संपादना संदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात पालकमंत्री राधाकृष्ण पाटील हे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरात जुना पुना नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते पत्रकार भवन अशी दोन उड्डाणपुल होणार आहेत. या उड्डाणपुलांमुळे एकूण २१९ मिळकती बाधित आहेत. त्यापैकी ५१ मिळकती या शासकीय जागेवरच्या आहेत. या शासकीय जागेवरील एकूण ७० हजार स्क्वेअर मीटर जागा बाधित आहे. त्यापैकी २० टक्के जागा ही जिल्हा प्रशासनाअंतर्गत आहे. तर उर्वरित शासकीय जागा ही विविध ११ शासकीय खात्यांच्या विभागाच्या अंतर्गत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापुरात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्र्यांनी शासकीय जागा संपादन करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. दरम्यान भूसंपादनासाठी ११७ कोटी रुपये यापूर्वी लागणार होते. मात्र, आता ३१ कोटी रुपयांनी ती रक्कम वाढली असून १४८ कोटी रुपये इतकी झाली आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button