आपचे नेते सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

आपचे नेते सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – हवाला प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन देण्यास राउज अव्हेन्यू न्यायालयाने आज ( दि. १७ ) नकार दिला. जैन यांच्यासोबत अन्य दोन आरोपींचा जामीन देखील नाकारण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाने 30 मे रोजी जैन यांना अटक केली होती.

जैन यांच्या जामीन अर्जावरचा निकाल न्यायमूर्ती विकास धूल यांनी गत सुनावणीवेळी राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी तिन्ही आरोपींना जामीन देण्यास त्यांनी नकार दिला. ईडीने हवाला प्रकरणात याआधीच सत्येंद्र जैन, त्यांच्या पत्नी व आठ इतर आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button