Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्नाने केला विवाहाबाबत खुलासा, “प्रत्येकजण माझ्या आयुष्याची…” | पुढारी

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्नाने केला विवाहाबाबत खुलासा, "प्रत्येकजण माझ्या आयुष्याची..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia ) मुंबईतील एका व्यावसायिकाशी विवाह बंधनात अडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली होती. परंतु, याच दरम्यान तिने तिच्या लग्नाविषयीचा मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने ( Tamannaah Bhatia ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट शेअर केल्‍या आहेत. तिने तिच्या लग्नविषयाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. यातील एका पोस्टमध्ये तिने साडी तर दुसऱ्या पोस्टमध्ये मिशी असलेला माणसाची वेशभूषा केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘हा माझा बिझनेसमॅन पती आहे. प्रत्येकजण माझ्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहित आहे.’ असे म्हटलं आहे. यावरून दोन्ही पोस्टमध्ये तमन्ना एकटीच असून. तिने व्हायरल झाल्याले बिझनेसमॅनची स्वत:च वेशभूषा केली आहे. यावरून ती लग्न करणार नसून, लग्नाबद्दलची पसरलेली अफवा असल्याचे समजते. या तिच्या पोस्टवरून तिने सोशल मीडियावरील तिच्या लग्नाची अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तमन्ना साऊथसोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. तमन्ना लवकरच आगामी ‘भोला शंकर’ या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. याशिवाय ती ‘गुरगुंडा सीता कलम’ आणि मल्याळम चित्रपट ‘बांद्रा’ मध्येही दिसणार आहे. अलीकडेच तमन्ना ‘बबली बाउन्सर’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले होते.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Back to top button