Eknath Shinde Jitendra Awhad : पोलीस योग्य ते कारवाई करतील; आव्हाडांवरील आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया | पुढारी

Eknath Shinde Jitendra Awhad : पोलीस योग्य ते कारवाई करतील; आव्हाडांवरील आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंग प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १४) माध्यमांशी बाेलताना स्‍पष्‍ट केले.

यावेळी मुख्‍यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने कोणत्याही सुडभावनेने कारवाई केलेली नाही. कायदा हातात घेतला तर तो खपवून घेतला जाणार नाही. पोलीस नियमांनुसार कारवाई करतील. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांच्या तथ्यानुसार कारवाई होईल. (Eknath Shinde)

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महिलेचे आरोप

मुंब्रात राहणाऱ्या एका (४० वर्षीय) महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेने सोमवारी (दि. १४) दुपारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडत आव्हाड यांच्यावर आरोप केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button