पुणे शहरात दोन ठिकाणी ‘एफडीए’च्या धाडी | पुढारी

पुणे शहरात दोन ठिकाणी ‘एफडीए’च्या धाडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने पुणे शहरात दोन ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 4 हजार 600 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल (एफआरआय) दाखल असून, सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पुणे कार्यालयास प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने रामटेकडी परिसरातील मे. शिवम पान शॉप आणि याच परिसरातील गायकवाडी सोसायटीतील मे. अमिना जनरल स्टोअर्स या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पुणे विभागात बर्‍याच ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ संदर्भात कारवाया करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थांच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांनी अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास 1800222365 या टोलफ—ी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले

Back to top button