‘दिल बेधुंद’चे टायटल पोस्टर रिलीज | पुढारी

'दिल बेधुंद'चे टायटल पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन : एक नवा कोरा कलरफुल लव्हस्टोरी असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दिल बेधुंद’ असं या रंगीबेरंगी प्रेमकथेचं टायटल पोस्टर रिलीज झाले आहे.

निर्माते शिवम पाटील यांनी तयार केलेल्या ‘दिल बेधुंद’ या चित्रपटाचं टायटल पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. संतोष गोपाळराव फुंडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात काहीतरी नावीन्यपूर्ण आणि आजवर चित्रपटांमध्ये दाखवलेल्या प्रेमकथांपेक्षा वेगळं आणि बेधुंद करणारं असं काहीतरी पाहायला मिळणार असल्याची झलक दाखवणारं हे टायटल पोस्टर आहे.

प्रत्येकानं कधी ना कधी आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी वळणावर प्रेम केलेलं असतं किंवा त्याला प्रेमाची अनुभूती झालेली असते. त्यामुळे प्रेम हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. एका सदाबहार प्रेमकथेला सुमधूर संगीताची किनार जोडत काहीसं वेगळ्या धाटणीचं कथानक सादर करण्याचा प्रयत्न ‘दिल बेधुंद’ मध्ये करण्यात आला आहे. ‘दिल बेधुंद’ चं लेखन करणाऱ्या गुड्डू देवांगन यांनीच या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारीही सांभाळली आहे.

या चित्रपटाचं टायटल पोस्टर इतकच चित्रपटही लक्षवेधी बनल्याचं दिग्दर्शक संतोष फुंडे यांनी सांगितले. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी पवन रेड्डी यांनी केली असून, संकलन रवी पाटील आणि विनोद राजे यांनी केलं आहे. संगीतकार स्वप्नील शिवणकर यांनी या चित्रपटातील गीतरचनांना सुमधूर स्वरसाज चढवला आहे. ‘दिल बेधुंद’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button