Koffee With Karan 7: तब्बल १७ वर्षांनंतर गौरी खान 'कॉफी विथ करण'मध्ये मध्ये येणार, मोठे खुलासे करणार! | पुढारी

Koffee With Karan 7: तब्बल १७ वर्षांनंतर गौरी खान 'कॉफी विथ करण'मध्ये मध्ये येणार, मोठे खुलासे करणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावतात. आता तब्बल १७ वर्षांनंतर शाहरुख खानची पत्नी गौरी खान हजेरी लावताना दिसणार आहे. करण जोहरच्या (Koffee With Karan 7) चॅट शो कॉफी विथ करण ७ चा नवीन भाग येणार आहे. शोच्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे या आठवड्यात शोमध्ये दिसणार आहेत, जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करणार आहेत. करण या तिघांना त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी विचारणार आहे. करण गौरी खानला शाहरुख आणि मुलगी सुहानाबद्दल अनेक गोष्टी विचारणार आहे. गौरी या शोमध्ये मुलगी सुहानाला डेटिंगच्या टिप्स देताना दिसत आहे. (Koffee With Karan 7)

करण जोहरने सोशल मीडियावर कॉफी विथ करण ७ चा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले – या सर्व फॅबुलस लेडीज हॉट कॉफी पसरवण्यासाठी तयार आहेत.

या डेटिंग टिप्स सुहानाला दिल्या होत्या

व्हिडिओमध्ये करण जोहर गौरीला विचारतो आहे की, तिला तिची मुलगी सुहानाला कोणत्या डेटिंग टिप्स द्यायला आवडेल. यावर गौरी म्हणाली- ‘एकाच वेळी दोन मुलांना डेट करू नका.’ गौरीचे हे ऐकून करण जोरजोरात हसायला लागतो.

आपल्या लव्हस्टोरीला दिलं हे टायटल

करण जोहर गौरीला विचारतो की, शाहरुखसोबतच्या तुझ्या प्रेमकथेला चित्रपटाचे शीर्षक द्यायचे असेल तर ते काय असेल? उत्तरात गौरी म्हणते- ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. मला तो चित्रपट खूप आवडतो.

महीप कपूरला हृतिक रोशनसोबत काम करायचे आहे

करण जोहरने महीप कपूरला विचारले की, जर तुला चित्रपटाची ऑफर असेल तर तुम्हाला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल. उत्तरात महीप म्हणते – मला वाटते माझी आणि हृतिक रोशनची जोडी एकत्र छान दिसेल. महीपचे म्हणणे ऐकल्यानंतर करण म्हणतो की, ‘तुझ्यात हे सांगण्याची खूप हिंमत आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Back to top button