Prabhas Birthday : बाहुबली ते आदिपुरूष… प्रभासचा थक्क करणारा प्रवास

Prabhas Birthday : बाहुबली ते आदिपुरूष… प्रभासचा थक्क करणारा प्रवास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क ; बॉलिवूड अभिनेता प्रभासचा सध्या आगामी 'आदिपुरूष' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटातील त्याची प्रभू रामाची भूमिका पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याधीही प्रभासचा त्याने 'बाहुबली' चित्रपटाने त्याला प्रचंड यश मिळाले. परंतु, बाहूबली ते आगामी आदिपुरूष चित्रपटापर्यतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. आज ( दि. २३ ) प्रभास वाढदिवस. यानिमित्त ( Prabhas Birthday ) जाणून घेवूयात त्याच्याविषय़ी…

प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी चेन्नई झाला. प्रभासचं पूर्ण नाव प्रभास राजू उप्पलापति आहे. . प्रभासने २००२ मध्ये 'ईश्वर' या चित्रपटातून डेब्यू केलं होतं २००३ मध्ये तो 'राघवेन्द्र' या चित्रपटात दिसला. २००४ मध्ये चित्रपट 'वर्धन' आणि २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा चित्रपट 'बाहुबली' मध्ये भूमिका साकारली. हा चित्रपट ५० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये १०० दिवसांपासून अधिक कालावधी चालला.

प्रभासने 'पौरनामी', 'योगी' आणि 'मुन्ना' में काम केले. २००९ मधील तेलुगु चित्रपट 'बिल्ला' मध्ये प्रभास-अनुष्का एकत्र होते. नंतर २०१३ 'मिर्ची' चित्रपटातदेखील दोघे एकत्र दिसले होते. यानंतर प्रभासचा आगामी 'आदिपुरूष' हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील त्याची प्रभू रामाची भूमिका पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Prabhas Birthday )

प्रभासचे शिक्षण

प्रभासचे सुरवातीचे शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले. पुढे हैदराबादमधील श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी टेकची पदवी घेतली. प्रभासचे वडील निर्माते सूर्यनारायण राजू आणि आईचे नाव शिवकुमारी आहे. सूर्यनारायण राजू तेलुगु चित्रपटांचे प्रसिध्द निर्माते आहेत. त्यांनी कृष्णावेनी, अमर दीपम, मधुरा स्वप्नम, त्रिशूलम, धर्म अधिकारी आणि बिल्ला यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आई शिव कुमारी गृहिणी आहे. प्रभासच्या मोठ्या भावाचे नाव प्रबोध असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

म्हणून अनुष्काने लग्न करू नये…

मे, २०१७ मध्ये एका वेब पोर्टलमधील माहितीनुसार, अनुष्काचं लग्न २०१५ मध्ये ठरलं होतं. पण, प्रभासच्या सांगण्यावरून अनुष्काला हे लग्न थांबवावं लागलं होतं. खरंतरं यावेळी प्रभासची इच्छा होती की, अनुष्काने केवळ 'बाहुबली' च्या शूटिंगवर लक्ष करावं. प्रभासने चित्रपट साहोसाठीदेखील अनुष्का शेट्टीच्‍या नावाची शिफारस केली होती. अधिक वजन वाढल्यामुळे निर्मात्यांनी अनुष्काच्या जागी श्रद्धा कपूरला कास्ट केलं होतं. जेव्हा प्रभास 'बाहुबली'चे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याला तब्बल ६ हजार मुलींचे मॅरेज प्रपोजल आले होते. प्रभासने पूर्ण लक्ष चित्रपटाकडे दिले. त्यामुळे सर्व लग्नाची स्थळं त्यांनी नाकारली. दरम्यान, मीडियामध्ये प्रभास-अनुष्का यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

प्रभास दाक्षिणात्‍य सेलेब्‍समध्‍ये सर्वांत अधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळख आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने 'बाहुबली' चित्रपटासाठी २५ कोटी आणि आगामी आदिपुरूष चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर त्‍याने 'साहो' साठी ३० कोटी रुपये मानधन मिळाले होते. एका वेबसाईटने दिलेल्‍या माहितीनुसार, सन २०१८ मध्‍ये प्रभासची एकूण संपत्ती १६० कोटी रुपये आहे. प्रभासचा हैदराबादमध्‍ये एक आलीशान बंगला आहे. हा बंगला त्‍याने २०१४ मध्‍ये विकत घेतला होता. प्रभास देशात सर्वांत अधिक टॅक्स देणारा अभिनेता आहे. सन २०१६ मध्‍ये प्रभासने जवळपास ७ कोटी रुपये टॅक्‍स भरला होता.

लक्झरी गाड्‍यांचा शौकीन

सिंपल दिसणारा प्रभास कारवेडा आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहे. ३.८९ कोटी रुपयांच्या किमतीची Range Rover, सर्वात महागडी गाडी Rolls-Royce Phantom आहे. या कारची किंमत जवळपास ८ कोटी रुपये आहे. प्रभासकडे ४८ लाखांची BMW X3, दोन कोटीं रुपयांची Jaguar XJ आणि ३० लाख रु. किंमतीची Skoda Superb देखील आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news