Hina Khan : दिवाळी पार्टीत हिना खान घसरली अन्… (VIDEO) | पुढारी

Hina Khan : दिवाळी पार्टीत हिना खान घसरली अन्... (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री हिना खान ( Hina Khan ) तिच्या नवनवीन फॅशन सेन्स आणि हॉट, बोल्ड लूकने चर्चेत असते. नुकतेच हिना खान बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत पोहोचली आहे. परंतु, या पार्टीला जाताना हिना खान चक्क फरशीवरून घसरली.

अभिनेत्री एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत टीव्ही ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यात तेजस्वी प्रकाश- करण कुंद्रा, दिव्यांका त्रिपाठी, अदा खान, प्रतीक सहजपाल, धीरज धूपर -पत्नी विन्नी धूपर, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी यासारख्या अनेकांनी हजेरी लावली होती. परंतु, यातील खास म्हणजे, हिना खानच्या ( Hina Khan ) स्काई ब्लू साडीवर चाहत्याची नजर खिळली.

या पार्टीत सहभागी होण्यासाठी अनेक स्टार दारातच फोटोला पोझ देते होते. या दरम्यान हिना खान देखील गाडीतून उतरून हॉलच्या मुख्य दरवाज्यापाशी आली. यानंतर तिने आपल्या हटके अंदाजात पापाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ दिली. मात्र, हॉलच्या आतमध्ये प्रवेश करताना अचानक तिच्या हाय हिल्स फरशीवरून घसरल्या. यावेळी तिच्या जवळ एक गार्डदेखील उभा होता. यावेळी प्रसंगावधान राखत हिनाने तिच्या पायाला दुखापत होण्याच्या आधीच पुन्हा सरळ चालत आतमध्ये गेली. यावेळी खास करून हिनाचा तोल गेला असून तिने लगेचच आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसते.

ही घटना हिना खान गडबडीत असल्यावर घडली आहे. हा व्हिडीओ विरल भयानी इंन्स्टाग्रानवर व्हायरल झाला आहे. यानंतर हिनाच्या चाहत्यांनी तिच्या साडीचे कौतुक करत तिला ‘पडशील’, ‘जरा हळू चाल’, ‘घाई करू नकोस’, असे म्हटलं आहे. यासोबतच काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला १ तासांत १० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा ? 

(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

Back to top button