संगमनेर : दूध संस्थेची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक | पुढारी

संगमनेर : दूध संस्थेची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील मनोली येथील एका दूध संस्थेकडून आगाऊ रक्कम घेऊन ती रक्कम दुधाच्या पगारातून संस्थेत जमा करील, असा विश्वास संपादन करत एका जणाने दूध संस्थेची सुमारे 3 लाख 74 हजार 730 रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी मनोली येथील एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील मनोली येथील संतोष सोपान शिंदे यांनी दि. 31 जानेवारी 7 ऑक्टोबर या दरम्यान संस्थेकडून अ‍ॅडव्हान्स घेऊन ती रक्कम संस्थेस दुधाचे पगारातून परत करीन, असा विश्वास संपादन केला.

या दरम्यान शिंदे याने वेळोवेळी काही रक्कम भरली. मात्र बाकी राहिलेली 3 लाख 74 हजार 730 रुपये ही रक्कम मच्छिंद्र शिंदे यांनी वेळोवेळी संस्थेत भरण्यास सांगितले असता संतोष शिंदे यांनी ती रक्कम संस्थेत भरण्यास नकार दिला.  याबाबत मच्छिंद्र सुखदेव भागवत यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी संतोष सोपान शिंदे (रा. मनोली) यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button