Iran Elnaaz Norouzi : विवस्त्र होत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने हिजाबचा केला विरोध; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Iran Elnaaz Norouzi : विवस्त्र होत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने हिजाबचा केला विरोध; व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिजाबमुळे इराणमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पहायला मिळत आहे. हिजाब आंदोलनाला पाठिंबा देत आता ठिकठिकाणी विरोध दर्शविला जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी याला विरोध केला आहे. नुकतेच प्रियांका चोप्रा आणि मंदाना करिमी या अभिनेत्रींनी हिजाबला विरोध केलेला दिसून आले. आता एलनाज नौरोजी या बॉलिवूड अभिनेत्रीने देखील या हिजाब विरोधात आवाज उठवलेला दिसून आले. एलनाजने नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध सीरीज सॅक्रेड गेम्समध्ये काम केलेले आहे. तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून हा विरोध तिने दर्शविला आहे. (sacred games 2 actress Elnaaz Norouzi on Iran Hijab Controversy)

Iran Elnaaz Norouzi : एलनाजने विवस्त्र होत हिजाब आंदोलनाला दिला पाठिंबा

हिजाब आंदोलनाला पाठिंबा देत असतानाचा एक व्हिडिओ एलनाजने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तीने अंगावरील एक एक करुन सर्व कपडे काढले आहेत. व्हिडिओच्या सुरूवातीला तीने काळ्या रंगाचा पारंपरिक बुरखा घातलेला होतो. बुर्ख्याच्या आतमध्ये तिने जीन्स, ड्रेस, सलवार कमीज, स्कर्ट इतके कपडे परिधान केलेले होते.

सर्वप्रथम ती अंगावरचा बुरखा काढला आणि. नंतर तीने हळूहळू अंगावरील सर्व कपडे काढून विवस्त्र होत हिजाब विरोध करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

‘कोणी कोणते कपडे घालावे, यावर कोणाचे बंधन नाही. यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र आहे’. हिजाब विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत अशा स्वरूपाचा संदेश आपल्या प्रत्यक्ष कृतीने एलनाजने  दिला आहे. या तिच्या पाठिंब्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

हेही वाचा

Back to top button