इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांचा तडकाफडकी राजीनामा – Infosys president Ravi Kumar S resigns | पुढारी

इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांचा तडकाफडकी राजीनामा - Infosys president Ravi Kumar S resigns

इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन – इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी कंपनीचे अध्यक्ष रवी कुमार एस यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (Infosys president Ravi Kumar S resigns)

इन्फोसिसने आज (मंगळवार) स्टॉक एक्सचेंजला ही कल्पना दिली. त्यांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
रवी कुमार एस हे इन्फोसिसच्या पहिल्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होते. सीईओ आणि सीओओनंतर सर्वाधिक वेतन रवी कुमार यांना होते. Infosys Global Services Organizationचे नेतृत्व त्यांच्याकडे होते.

पायाभूत सुविधा, कन्सल्टिंग, पारंपरिक तंत्रज्ञान, क्लाऊड अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी इन्फोसिसचा विस्तार केला. इन्फोसिसमध्ये सुरू असलेल्या मेटव्हर्सच्या प्रोजेक्टची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती.  इन्फोसिसने रवी कुमार यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. रवी कुमार एस २०१६पासून या पदावर कार्यरत आहेत.

हेही वाचा

Back to top button