Russia Vs Meta : रशियाने फेसबुकला ठरवले दहशतवादी; मेटाला टाकले ‘या’ यादीत | पुढारी

Russia Vs Meta : रशियाने फेसबुकला ठरवले दहशतवादी; मेटाला टाकले ‘या’ यादीत

पुढारी ऑनलाईन : रशियाने फेसबुक (Russia Vs Meta) म्हणजे मूळ कंपनी मेटाला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले आहे. सध्या रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु आहे. सहा महिन्यांहून अधिककाळ हे युद्ध चालू आहे. रशियाने युक्रेनच्या काही भाग ताब्यात देखील घेतला आहे. शिवाय मागील दोन तीन दिवसांपासून रशियाने युक्रेन वरील हल्ले तीव्र केले आहे. अशातच रशियासारख्या मोठ्या देशाने सोशल माध्यमातील आघाडीची समजल्या जाणाऱ्या मेटा या कंपनीला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकल्याने अवघ्या जगाच्याच भूवया उंचावल्या आहेत.

रशियाने म्हटले आहे की, मेटाने फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल प्लॅटफॉर्मवर रशिया आणि रशियन  कंपन्यांना भेदभावपूर्ण वागणूक देत त्यांच्याशी दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदरची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत फेसबुकने आरोप केला आहे की अशा पद्धतीने रशिया आपल्या जनतेला अधिकृत माहिती पासून वंचित ठेवत आहे. (Russia Vs Meta)

रशियन सरकारची सेन्सॉरशिप एजन्सी (Roskomnadzor) यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2020 पासून फेसबुकने रशियन मीडियाविरुद्ध भेदभावपूर्ण वागल्याचे एकूण 26 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. फेडरल सर्व्हिस फॉर फायनान्शियल मॉनिटरिंगच्या (Rosfinmonitoring) डेटाबेसनुसार, रशियाने मंगळवारी यूएस टेक कंपनी मेटाला दहशतवादी आणि अतिरेक्यांच्या यादीत टाकले. मेटा ही इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी आहे. (Russia Vs Meta)

मार्चच्या उत्तरार्धात, रशियाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर “दहशतवादी कारवाया केल्याबद्दल” बंदी घातली. मार्चमध्ये रशियामध्ये दहशतवादी कारवाया साठी दोषी आढळल्यानंतर मॉस्को न्यायालयाने जूनमध्ये META चे अपील नाकारले. कोर्टात, META च्या वकिलाने त्यावेळी सांगितले की META अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेली नाही आणि रुसोफोबियाच्या विरोधात नाही. (Russia Vs Meta)

तर दुसरीकडे फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचा या वर्षी मे महिन्यात 963 प्रमुख अमेरिकन लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला होते. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचाही समावेश होता. ज्यांना रशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे रशियाने हे पाऊल अशावेळी उचलले आहे, जेव्हा त्याने पुन्हा युक्रेनच्या ऊर्जा निर्मिती केंद्रावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. (Russia Vs Meta)


अधिक वाचा :

Back to top button