Sandeep Lamichhane : ‘या’ आयपीएल क्रिकेटरला बलात्कार प्रकरणी अटक | पुढारी

Sandeep Lamichhane : ‘या’ आयपीएल क्रिकेटरला बलात्कार प्रकरणी अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या (Sandeep Lamichhane) अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप हा मायदेशी (नेपाळ) येताच त्याला अटक करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संदीपला गुरुवारी (दि. ६) सकाळी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. तत्पूर्वी आज सकाळी घरी परतणार असल्याची माहिती खुद्द संदीपने फेसबुक पोस्टद्वारे दिली होती.

क्रिकेटपटू संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने आपल्यावर काठमांडूमधील एका हॉटेलच्या खोलीत बलात्कार केला असल्याचा आरोप १७ वर्षीय तरुणीने केला आहे. गौशाळा महानगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये किशोरवयीन पीडीत मुलीने तक्रार दाखल केली आहे. ऑगस्टमध्ये हॉटेलच्या खोलीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

गौशाळा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने 21 ऑगस्ट रोजी पीडित मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेले. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. संदीपने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू आहे. त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले होते.

संदीपने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले?

गुरुवारी सकाळी मायदेशी परतण्यापूर्वी संदीप लामिछाने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. ‘नेपाळमध्ये येऊन मी अत्मसमर्पण करण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे. त्यासाठी मी मी सकाळी १०:०० वाजता कतार एअरवेजने काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहे. मला खात्री आहे की मला न्याय मिळेल आणि माझ्या प्रिय देशाचे नाव आणि कीर्तीसाठी मी लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतेन. या प्रकरणी लवकरात लवकर खटला चालवावा अशी इच्छा आहे. तपासाच्या सर्व टप्प्यांवर मी पूर्ण सहकार्य करेन आणि माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन. न्यायाचा विजय होईल.

संदीपवर अटक वॉरंट जारी करण्यात आले

नुकतेच काठमांडू पोलिसांचे प्रवक्ते दिनेश मैनाली यांनी सांगितले होते की, जिल्हा न्यायालयाने पुढील तपासासाठी संदीप लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. जर संदीप नेपाळमध्ये नसेल तर काठमांडू पोलीस परदेशी एजन्सी किंवा इंटरपोलची मदत घेतील, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले होते. संदीपला गेल्या वर्षीच नेपाळच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

Back to top button