Jalgaon Lok Sabha | आचारसंहिता काळात ८ हजार ३३० जणांविरुद्ध कारवाई | पुढारी

Jalgaon Lok Sabha | आचारसंहिता काळात ८ हजार ३३० जणांविरुद्ध कारवाई

जळगाव- जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आर्म ॲक्ट, एमडी, गुटखा, गांजा असा एकूण सुमारे ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शातेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले होते. १६ मार्च पासून पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी तसेच अवैध धंदे चालकांवर कारवाईचा धडाका लावलेला होता. यामध्ये आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे. यात ९ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत तर १ गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आर्मी मध्ये पिस्टल सात काडतूस असं एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर आर्मी मध्येच 12 तलवार बच्चा खूप जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच यापैकी ३ हजार २५० जणांना नोटीस बजावण्यात आली असून २ हजार ७६४ जणांना नॉल बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे चालकांसह आमली पदार्थांची वाहतुक व विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीची कारवाई करून 10,71,7803 रुपयाचा मध्यम आल जप्त व नष्ट केला आहे गाजा 114.81 जप्त करण्यात आला असून 10,77,020 किमतीचा मुद्देमाल आहे. बुटक्या 14 प्रकरणांमध्ये एक कोटी 71 लाख 86 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

हेही वाचा –

Back to top button