परभणी : देवगावफाटा येथे भरदिवसा घरफोडी; १६ हजार लंपास | पुढारी

परभणी : देवगावफाटा येथे भरदिवसा घरफोडी; १६ हजार लंपास

देवगावफाटा; पुढारी वृत्तसेवा : देवगावफाटा (ता. सेलू ) येथे भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील १६ हजार रोख रक्कम लंपास केली. या घटनेने परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

देवगावफाटा येथील सुरेश आसाराम मोरे यांचे देवगावफाटा-सेलू महामार्गालगत स्वतःच्या शेतात घर आहे.  गुरुवार (दि. २२ ) सर्व कुटूंब घराला कुलून लावून बाहेर गेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील कपडे व इतर संसारपयोगी साहित्य अस्ताव्यस्त केले. कपाटातील आधारकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्ड व काही कागदपत्रे आणि १६ हजार रूपये ठेवलेली बॅग लंपास केली आहे.

या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर सदरील घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद साने आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांनी यापुढे सतर्क राहावे आणि प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने आपल्या गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे पोलिसांनी आवाहन केले.

हेही वाचा: 

Back to top button