श्री संत बाळूमामा पालखी सोहळा खोर मुक्कामी | पुढारी

श्री संत बाळूमामा पालखी सोहळा खोर मुक्कामी

खोर; पुढारी वृत्तसेवा: श्री संत सद्गुरू बाळूमामा पालखी सोहळा मुक्कामी विसावला. श्री संत बाळूमामा पालखी सोहळा वढाणे (ता. बारामती) येथील मुक्काम उरकून दौंड तालुक्यात मार्गस्थ झाला आहे. याबाबत माहिती देताना श्री बाळूमामा पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरव बापू हातनोरकर म्हणाले की, खोरमध्ये हा पालखी सोहळा नं 16 असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 18 पालख्या आहेत. जवळपास 45 हजार बकरी असून नं 16 मध्ये 2 हजार बकरी आहेत. दोन दिवस खोर गावात मुक्कामी असलेल्या पालखीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी ह.भ.प. चंद्रकांत महाराज धायगुडे यांचे कीर्तन होणार असून दुसर्‍या दिवशी ह.भ.प. विठ्ठल महाराज लवंगे यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे. या पालखी सोहळ्याचे ढोल- ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले आहे. खोरच्या परिसरातील भाविक भक्तांनी श्री बाळूमामा यांची बकरी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. खोरमधील शेतकर्‍यांनी आवर्जून बाळूमामाच्या बकर्‍यांना आपल्या शेतात नेऊन चारा खाण्यास घालत आहेत. या पालखी सोहळ्यास खोर ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे. सायंकाळी महाप्रदाचे आयोजन केले.

Back to top button