Navratri : कलाकारांनी सांगितल्‍या नवरात्रीच्‍या गोड आठवणी | पुढारी

Navratri : कलाकारांनी सांगितल्‍या नवरात्रीच्‍या गोड आठवणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक हिंदी मालिकेतील कलाकारांनी नवरात्रीच्‍या गोड आठवणी सांगितल्‍या आहेत. सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये वंदना वागलेची भूमिका साकारणाऱ्या परिवा प्रणती म्‍हणाल्‍या, ‘’नवरात्रीदरम्‍यान मला मुंबईतील रोषणाई पाहायला खूप आवडते. माझे कुटुंबीय या सणादरम्यान उपवास व पूजा करतात. नवरात्रीदरम्‍यान शहरातील उत्‍साहपूर्ण वातावरण पाहता मला वाटते की, असे क्षण आपल्‍याला दररोज पाहायला मिळोत. तसेच गरबा व दांडिया उत्‍सवी वातावरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात. माझ्या मुलाला गरबा खेळताना पाहून मला खूप आनंद होतो. नवरात्रीला माझे आई-वडील, आजी व कुटुंबातील बहुतेक सदस्‍य उपवास करतात. माझ्या मते उपवास करणे लाभदायी देखील आहे. कारण यामुळे मनसोक्तपणे खाण्‍यावर नियंत्रण ठेवता येते. यंदा नवरात्री आम्‍ही शूटिंगमध्‍ये व्‍यस्‍त असणार आहोत. पण टीम काही प्रमाणात सणाचा आनंद घेणार आहे, ज्‍यासाठी आम्‍ही सर्व उत्‍सुक आहोत.’’

सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये सखी वागलेची भूमिका साकारणारी चिन्‍मयी साळवी म्‍हणाली, ‘’मी डान्‍सर आहे. म्‍हणून दर नवरात्रीला आमचा डान्‍स क्‍लास एक शो सादर करतो. याव्‍यतिरिक्‍त माझे मित्र-मैत्रीणी व मी डोंबिवलीसारख्‍या ठिकाणी गरबा खेळायला जायचो. आम्‍ही नवरात्रीमधील प्रत्‍येक दिवसाच्‍या रंगाचे पोशाख परिधान करायचो आणि गरबाच्‍या स्‍टेप्‍स करताना खूप धमाल यायची. माझे काका मुलुंडच्‍या गुजराती समुदायामध्‍ये राहतात, म्‍हणून मी तेथे देखील गरबा खेळायला जायची. एक डान्‍सर म्‍हणून मला सर्व नृत्‍यप्रकार येतात आणि लोक पारंपरिक गरबा खेळत असलेल्‍या ठिकाणी जायला आवडते. मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये काम करण्‍यास सुरूवात केल्‍यापासून माझे अनेक गुजराती मित्रमैत्रिणी झाल्‍या आहेत, ज्‍यामुळे मी यंदा गुजराती मिष्‍टान्‍नांचा आस्‍वाद घेण्‍यास उत्‍सुक आहे.’’

मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये सोनल पारिखची भूमिका साकारणारी भक्‍ती राठोड म्‍हणाली, ‘’अहमदाबादमध्‍ये माझ्या घराजवळ अत्‍यंत लोकप्रिय स्‍थळ लॉ गार्डन आहे. जेथे सर्व प्रकारच्‍या चनिया चोली आणि विविध रंगांचे व डिझाइन्‍सचे पोशाख आहेत. तुम्‍हाला पाहिजे असलेल्‍या सर्व गोष्‍टी येथे मिळतात. दरवर्षी नवरात्रीदरम्‍यान मी व माझी बहीण येथूनच आमचे पोशाख खरेदी करायचो. सनेडो, विशिष्‍ट प्रकारची चनिया चोली, गुजराती साडी उपडा असे सर्व प्रकारचे कपडे आम्‍ही खरेदी करायचो. आम्‍ही दरवर्षी आमच्‍या आईसोबत गरब्‍यासाठी सजावट करतो, आरती म्‍हणतो आणि गरबा खेळतो. माझ्यासाठी नवरात्री सण फक्‍त परंपरा नसून स्‍वत:मध्‍ये आत्मीयता व स्वावलंबीपणा निर्माण करण्‍यासाठी देखील महत्‍वपूर्ण आहे.’’

सोनी सबवरील मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये चिराग पटेलची भूमिका साकारणारा दर्शन गुर्जर म्‍हणाला, ‘’दर नवरात्रीला मी भव्‍य सेलिब्रेशन्‍ससाठी माझ्या मूळगावी जातो. माझ्या घराच्‍या जवळ प्रगती मैदान आहे, जेथे विविध सेलिब्रिटीज येतात आणि प्रत्‍येकाने सर्वोत्तम उत्‍सवी पोशाख परिधान केलेला असतो. नवरात्री उत्‍सवादरम्‍यान माझा उत्‍साह व मूड अधिक शिगेला पोहोचलेला असतो. मी मुंबईमधील नवरात्रीचा देखील आनंद घेतला आहे आणि मला शहरातील उत्‍साहपूर्ण वातावरण आवडते, जेथे संपूर्ण शहर आनंदाने भरलेले असते.’’

मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये पुष्‍पा पटेलची भूमिका साकारणारी करूणा पांडे म्‍हणाली, ‘’मी उत्तराखंडची असल्‍यामुळे नवरात्री सणाचा कमी प्रमाणात आनंद घेते. माझे वडील सैन्‍यामध्‍ये होते, ज्‍यामुळे मी भारतभरात शिक्षण घेतले आहे आणि या सणाचा काही प्रमाणात अनुभव घेण्‍यास मिळाला. मला हा सण आणि सणाशी संबंधित पवित्र ऊर्जा आवडते. यंदा मी माझे सहकारी व मित्रमैत्रिणींसोबत गरबा व दांडिया खेळण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे. तसेच मी नवरात्री उपवासाला खूप मानते. उपवास हा माँ दुर्गाप्रती आदर दाखवण्‍याचा एक उत्तम मार्ग आहे. माँ दुर्गा आपल्‍या सर्वांची काळजी घेते. दुर्गा माता आणि तिचे सर्व अवतार मला प्रेरित करतात, मी तिची तत्त्वे जोपासण्‍याचा प्रयत्‍न करते. तसेच सनातन धर्मच्‍या शास्‍त्रानुसार उपवास डिटॉक्सिफिकेशनशी संबंधित आहे आणि त्‍यामधून भूकेवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होते.’’

Back to top button