चासकमान धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग | पुढारी

चासकमान धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग

कडूस; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसाने एकूण 8.53 टीएमसी आणि उपयुक्त 7.57 टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे चास गावची स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. कळमोडी व चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मागील 24 तासात 29 मिलिमीटर तर एकूण 938 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

धरण क्षेत्रांत पडत असलेल्या पावसाने आरळा व भीमा नदीने पात्र सोडले असून दुथडी भरून वाहत असल्याने चासकमान धरणात 12 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी (दि. 16) चासकमान धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी 50 सेंटीमीटरने उघडून सुरुवातीला सकाळी सहा वाजता 4 हजार 610 तर दुपारी दीड वाजता 12 हजार 650 क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button