नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार | पुढारी

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये पावसाची संततधार सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या टोमॅटोसह भाजीपाला पिकांचा हंगाम सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर फवारणीचा खर्च वाढत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. तालुक्यातील सर्वच धरणे 100 टक्के भरली असून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. त्यातच दिंडोरी तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीसाठी रविवारी, दि.18 मतदान असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीत देखील घट होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी झालेला पाऊस असा (मीमी)

दिंडोरी 26.00, रामशेज 23.00, ननाशी 56.00, उमराळे 32.00, लखमापूर 7.00, कोशिंबे 46.00, मोहाडी 8.00, वरखेडा 15.00, कसबे वणी 28.00.

हेही वाचा:

Back to top button